
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याच्या एक दिवस अगोदरच जम्मूमध्ये सुरक्षा आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. संबंधित अधिकार्यांनी सांगितले की, गोळीबारामध्ये एक सुरक्षा अधिकारी शहीद झाले आहेत. तर, 4 अधिकारी जखमी झालेली आहेत. तर या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
जम्मूमधील चढ्ढा कँप परिसरात शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी केंद्रीय औद्योगित सुरक्षा बलच्या बसवर हल्ला केला. त्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. अधिकार्यांनी सांगितले की, या बसमध्ये 15 जवान होते आणि ते ड्युटीवर जात होते. जम्मूच्या चढ्ढा कँपवर शुक्रवारी पहाटे 4 वाजता हा हल्ला केला आहे. जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले आणि त्यांना तेथून पळून जाण्यास भाग पाडले.
या चकमकीमध्ये शहीद झालेल्या जवानाचे नाव मुकेश सिंह असे आहे. ते जम्मू झोनचे एडीजीपी या पदावर कार्यरत होते. सध्या परिसर रिकामा करण्यात आला आहे. चकमक अजुनही सुरू आहे. अजून या परिसरात दहशतवादी लपून बसलेले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू-काश्मीर दौरा नियोजित होता. 24 तारखेला पंचायती राज दिवसानिमित्त पंतप्रधान मोदी पल्ली गावात जाणार आहेत. तत्पूर्वीच ही चकमक झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta