हरियाणा : हरियाणात शनिवारी निवडणुकीची धामधूम संपली आहे. मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजपचे टेन्शन वाढले आहे. तर या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर आम आदमी पक्षाला फटका बसल्याचे दिसत आहे. एका एक्झिट पोलच्या आकेडवारीत काँग्रेस ५० पार जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला केवळ ०-१ जागा दाखवण्यात येत आहे. हरियाणात एकूण ९० विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली.
दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार, भाजप १५-२९ जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काँग्रेसला ४४-५४ जागा दाखवण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्ष ०-१ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर अन्य पक्ष ४-९ जागा जिंकू शकतात. या एक्स्झिट पोलने भाजपसहित आम आदमी पक्षाचे टेन्शन वाढले आहे.
रिपब्लिक वर्ल्डच्या मॅट्रिज एक्झिट पोलनुसार, हरियाणात काँग्रेस ५५-६२ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर भाजप फक्त १८-२४ जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आयएनएलडी म्हणजे नॅशनल लोकदलाला फक्त ३ ते ६ जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर अन्य पक्षांना २ ते ५ जागा दाखवण्यात आल्या आहेत.