नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 नंतर समाप्त होणार आहे. दरम्यान, चंद्रचूड यांनी त्यांच्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे दिली जावी, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. न्यायामूर्ती खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असल्याने त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. 1983 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली होती.
डी वाय चंद्रचूड 13 मे 2016 रोजी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले होते. न्यायमूर्ती खन्ना हे 18 जानेवारी 2019 मध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले आहेत. दरम्यान आता चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून खन्ना यांच्याकडे जबाबदारी देण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. यापूर्वी न्यायामूर्ती खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
न्यायामूर्ती खन्ना 6 महिन्यानंतर निवृत्त होणार
नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या अधिकृत माहितीनुसार, जस्टीस खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. अशात त्यांनी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारला तर ते सहा महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यानंतर सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील न्यायमूर्तींची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta