Tuesday , March 3 2026
Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love

 

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सुरक्षा दलाचे चार जवान घायाळ झाले आहेत.

काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील खानयारमध्ये आज शनिवारी सकाळपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एका सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. श्रीनगरमधील खानयारमध्ये सुरक्षा दलाकडून ऑपरेशन राबवलं जात आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दुसरी चकमक ही दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारनूमध्ये सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोन्ही चकमकीत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *