
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात 8 ते 10 जवान होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जाणारे 11 एमएलआयच्या लष्करी वाहनाचा घोरा पोस्टजवळ अपघात झाला. वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत कोसळले. माहिती मिळताच 11 एमएलआयची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta