बठिंडा : प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन थेट नाल्यात कोसळली. या बसमध्ये किमान 50 प्रवासी असल्याची माहिती आहे. पंजाबच्या बठिंडा येथे हा भीषण अपघात झाला आहे. बठिंडाच्या जीवन सिंह वाला येथे हा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस थेट पुलावरुन नाल्यात कोसळली. प्रशासन आणि स्थानिक लोकांनी बसच्या काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढलं.
बठिंडा-शार्दुलगढ़ मार्गावर या खासगी कंपनीच्या प्रवासी बसची वाहतूक सुरु होती. पुलावरुन बस खाली कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. हा अपघात कसा झाला, ते अजून स्पष्ट झालेले नाही. बठिंडाचे एसएसपी अवनीत कोंडल दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत.
अपघाताच्यावेळी पाऊस सुरु असावा, त्याचवेळी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. नेमका अपघात कसा झाला, हे अजून समजू शकलेले नाही. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. 24 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
Belgaum Varta Belgaum Varta