Tuesday , December 9 2025
Breaking News

जयपूरमध्ये व्यापाऱ्याने ९ जणांना चिरडले; तिघांचा मृत्यू

Spread the love

 

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एका भरधाव एसयूव्ही कारने रस्त्यावर गोंधळ उडवला. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या रस्त्यावर ७ किमीपर्यंत कार भरधाव वेगात चालवली. कार चालकाने नऊ जणांचा चिरडले. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा पादचारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. जयपूरमधील एमआय रोडवर एका भरधाव कारने वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळाली होती. यानंतर भरधाव गाडी शहरातील अरुंद रस्त्यांमध्ये शिरली. लोकांना चिरडल्यानंतर, कार एका अरुंद रस्त्यावर अडकली आणि स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला पकडले. या घटनेनंतर मंगळवारी सकाळपासून लोक नाहरगड पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत आहेत.

वीरेंद्र सिंग (४८), ममता कंवर (५०), मोनेश सोनी (२८), मोहम्मद जलालुद्दीन (४४), दीपिका सैनी (१७), विजय नारायण (६५) गोविंद (२४) आणि अवधेश पारीक (३७) यांना उपचारासाठी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी ममता कंवर आणि अवधेश यांना मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी वीरेंद्र सिंगचा मृत्यू झाला. नाहरगड रोडवर कारने धडक दिलेल्या ७ जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आरोपी उस्मान खान याला पकडलं. रात्री उशिरा आरोपी उस्मान खानचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, तो मद्यधुंद होता. आरोपी हा जयपूरमधील शास्त्री नगर येथील राणा कॉलनीचा रहिवासी आहे. त्यांचा विश्वकर्मा औद्योगिक वसाहतीमध्ये त्याचा लोखंडी पलंग बनवण्याचा कारखाना आहे. मृतांच्या कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *