Tuesday , March 3 2026
Breaking News

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू

Spread the love

 

जम्मू-काश्मीर (पहलगाम) : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना ‘तुम्ही मुस्लिम आहात का?’ असा सवाल केला. पर्यटकांनी नाही उत्तर दिल्यावर दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये चार पर्यटक महाराष्ट्रातील तर दोन पर्यटक पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ एक नंबर जारी केला आहे. कोणत्याही पर्यटकाला काही अडचण असल्यास किंवा अशा काही घटना दिसल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. नंबर – 9596777669 यावर पोलिसांनी संपर्क साधण्यास सांगितलं आहे तर, 9419051940 हा व्हॉट्सअप नंबर आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *