Monday , December 8 2025
Breaking News

विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार

Spread the love

 

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर काही वेळातच या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये विमान नागरी वस्तीच्या अगदी जवळून गेल्याचे आणि काही वेळात कोसळल्याचे स्पष्ट दिसत होते. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्याने विमान अपघाताची वेळ इतकी अचूक कशी काय साधली? याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता सदर व्हिडीओ चित्रीत करणारा युवक समोर आला असून पोलिसांनी त्याला प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या युवकाचे नाव आर्यन असून तो नुकताच गावावरून आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. आर्यनने सहज रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे संबंध जगासमोर एअर इंडियाच्या भीषण अपघाताच दृश्य जगासमोर आले. त्यानंतर विमानतळावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यही समोर आले होते. मात्र आर्यनच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ अगदी जवळून काढल्याचे दिसत होते. यामुळे सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून व्हिडीओ रेकॉर्ड करण्याच्या कारणाचा तपास घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.

द लल्लनटॉप या यूट्यूब वाहिनीला आर्यनने मुलाखत दिली असून व्हिडीओ कसा रेकॉर्ड केला याची माहिती दिली. आर्यन हा मुळचा अहमदाबादमधील रहिवासी नाही. तो गावावरून नातेवाईकांच्या घरी आला होता. केवळ उत्सुकतेपोटी आर्यन व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. विमान जवळून जात असल्याचे व्हिडीओ गावातील मित्रांना दाखवायचे होते, त्यामुळे आपण रेकॉर्ड करत होतो, असे त्याने सांगितले.

आर्यनच्या बहिणीने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, आर्यन उत्सुकतेपोटी व्हिडीओ काढत होता. मात्र जसा विमानाचा स्फोट झाला, तेव्हा त्याने व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद केले. स्फोट झाल्यामुळे तो खूप घाबरला. तसेच आर्यनने सांगितले की, विमान आकाशात उडताना पाहून त्याला कुतूहल वाटत होते. मीही एकदिवस विमानात बसेल, अशी स्वप्न तो पाहत होता. मात्र जेव्हा विमानाचा स्फोट होताना त्याने पाहिले, तेव्हापासून तो विमानात कधीही बसणार नाही, असे म्हणत आहे. आता पोलिसांनी आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या शेजारच्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आर्यन गावावरून आला असल्यामुळे त्याच्यासाठी विमान उडताना पाहणे नवीन होते, म्हणून तो व्हिडीओ काढत असल्याचे शेजाऱ्यांनीही सांगितले. तसेच स्फोट झाल्यानंतर आम्हाला आवाज ऐकू आला नाही. मात्र नंतर काळ्या धुराचे लोट दिसू लागल्यावर स्फोट झाल्याचे कळले.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *