
नवी दिल्ली : डेहराडूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा जण होते. आम्ही या प्रकरणी अधिक माहितीची वाट पाहत आहोत,” असे उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले. त्यांनी यापूर्वी त्रिजुगीनारायण आणि गौरीकुंड दरम्यान हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशन कंपनीचे एक हेलिकॉप्टर कोसळले. केदारनाथमधील गरुडचट्टीजवळ हा मोठा अपघात झाला. या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी साधारण 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे.
कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. यानंतर त्या ठिकाणी गवत कापणाऱ्या महिलांनी तात्काळ प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या टीम्स लगेच घटनास्थळी पोहोचल्या. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबत 5 प्रौढ आणि दोन लहान मुलं प्रवास करत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख
सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अनेक अवशेष विखुरलेले पडले आहेत. या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केली आहे. “जनपद रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. यासाठी केदारनाथांकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” असे पुष्कर सिंह म्हणाले.

Belgaum Varta Belgaum Varta