उत्तराखंडमध्ये बुधवारी (ता. २५) चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या सहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. टिहरी जिल्ह्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी स्वयंपाकासाठी गाडीत गॅस सिलिंडर ठेवला होता. सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याने हा अपघात झाला, अशी माहिती टिहरीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातात प्राण गमावलेले सर्व प्रवासी हे पश्चिम बंगालचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, अंकित कुमार, हयात सिंग, मेहेरबान सिंग, दबडे, अंबिका आणि कुमारी मोनिका अशी मृतांची नावे आहेत. जखमींना पबळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून दोन गंभीर जखमींना पौरी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. सर्व प्रवासी कारने चारधाम यात्रेसाठी निघाले होते. प्रवाशांनी स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरही सोबत घेतला होता.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी आरडाओरड झाली. यानंतर घटनेची माहिती लोकांनी तातडीने पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहांना वाहनातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले.
Check Also
झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी
Spread the love नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन …