Sunday , September 20 2026
Breaking News

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; 20 जूनला मतदान

Spread the love

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे.
निवडणूक आयोगाकडून देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची बुधवारी घोषणा केली. या तीनही राज्यातील एकूण ३० जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

नोटिफिकेशन – २ जून २०२२ रोजी

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ९ जून २०२२

उमेदवारांच्या अर्जांची छाननी – १० जून २०२२

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – १३ जून २०२२

मतदानाचा दिनांक – २० जून २०२२

मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

मतमोजणीचा दिनांक – २० जून २०२२ (सायंकाळी ५ वाजता)

‘या’ सभासदांचा संपतोय कार्यकाळ

सदाशिव खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते, रामनिवास सिंह या दहा मंत्र्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत असल्यानं या जागांवर निवडणूक होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *