नवी दिल्ली : कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार तसेच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना कन्हैया कुमार आणि मेवाणींच्या काँग्रेस प्रवेशाने चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. दरम्यान, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना पक्षात प्रवेश देण्यावरून मत मतांतर होती.
कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार तसंच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या काँग्रेस प्रवेशाने पुढील वर्षी भाजपशासित गुजरातमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश राजकारणात काय बदल घडवून आणतो हे पाहावे लागणार आहे.
कन्हैय्या कुमार 2021 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) मध्ये सामील झाले होते आणि बिहारमधील बेगूसराय मतदारसंघातून भाजपाचे गिरीराज सिंह यांच्या हातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
