Saturday , May 25 2024
Breaking News

कोगनोळी जवळ अपघातात चालक जागीच ठार

Spread the love

कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्‍या आरटीओ ऑफिस जवळ ट्रक व टाटा एस त्यांच्यात झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 27 रोजी रात्री घडली. दादासाहेब महादेव खंदारे वय 35 (उस्मानाबाद) सध्या राहणार पुणे हे जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक बेंगलोरहून कोल्हापूरकडे जात होता. कोगनोळीजवळ असणार्‍या कर्नाटक आरटीओ चेक पोस्टमध्ये कागदपत्राची तपासणी करण्यासाठी हा ट्रक थांबला होता. याच दरम्यान बेंगलोर होऊन पुण्याकडे टाटा एस गाडी निघाली होती. टाटा एस गाडीची ट्रकला मागील बाजूने जोराची धडक बसली. या धडकेमध्ये टाटा एस चालक जागीच ठार झाला.
या अपघातामध्ये ट्रकचे किरकोळ तर टाटा एस गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक एस. ए. टोलगी, पी. एम. घस्ती व पोलीसांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी जय हिंद रोड डेव्हलपर्सच्या कर्मचार्‍यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.

About Belgaum Varta

Check Also

कणगला येथे नृसिंह सरस्वती जयंती निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : कणगला येथे नरसिंह, सरस्वती यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *