Sunday , July 21 2024
Breaking News

नवज्योत सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Spread the love

काँग्रेस हायकमांडने फेटाळला सिद्धू यांचा राजीनामा

चंदीगड : पंजाबमधील राजकीय नाट्यमय घडामोडी थांबत नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा सोपवलेला असताना, आता पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे.
सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी पत्र पाठवलेले आहे.
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात सिद्धू म्हणतात, तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.
गेल्या काही दिवासांपासून पंजाबमधील राजकारण दररोज वेगवेगळी वळणं घेताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाने राजकीय घडामोडींना सुरूवात झाली. काही दिवसांनी या दोघांमध्ये सामंजस्य झाल्याचं देखील दिसून आलं होतं. मात्र, अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणंच बदलली. पण ही समीकरणं आता मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

About Belgaum Varta

Check Also

उत्तर प्रदेशात रेल्वे रुळावरून घसरली; चौघांचा मृत्यू

Spread the love  चंदीगड : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड-डिब्रूगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *