Tuesday , March 3 2026
Breaking News

आज पुन्हा राहुल गांधींची ईडी चौकशी; कालच्या साडेदहा तासांच्या चौकशीनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित

Spread the love

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून दोन टप्प्यात साडेदहा तास चौकशी केली जाणार आहे. आज पुन्हा चौकशी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी सुरु आहे. पण काल (सोमवारी) एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
नॅशनल हेराल्डप्रकरणी राहुल गांधी यांची ईडीकडून दोन टप्प्यात साडेदहा तास चौकशी झाली. चौकशीनंतर राहुल गांधी ईडी कार्यालयाबाहेर पडले. राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल तीन तास चौकशी झाली. यात राहुल गांधींना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दुपारी लंचब्रेकनंतर पुन्हा राहुल गांधी यांच्या चौकशीला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेविषयी राहुल गाधींना प्रश्न विचारले गेल्याची माहिती आहे.

दिल्लीत मध्यरात्री सर्वजण झोपले असताना काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अस्वस्थता त्यांना झोपू देत नव्हती, कारण काय होणार? या चिंतेनं ते रात्री साडेअकरापर्यंत जागे राहिले. काही पोलीस ठाण्यात तर काही रस्त्यावर. सर्वांच्या नजरा ईडीच्या कार्यालयावर होत्या, जिथे राहुल गांधींची सुमारे साडेदहा तास चौकशी करण्यात आली. राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडताच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. राहुल गांधी घरी पोहोचल्यावर त्यांची बहीण प्रियांका गांधीही त्यांना भेटायला आल्या.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 459 काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची सुटका केली. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ईडी कार्यालयावर मोर्चा काढत असताना या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर हे लोक गांधीगिरीवर उतरले.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *