Saturday , July 27 2024
Breaking News

एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा समुहाकडेच!

Spread the love

नवी दिल्ली : सरकारची एअर इंडियाची पुन्हा एकदा टाटा समुहाकडे जाणार आहे. सर्वात जास्त बोली लावून टाटा सन्सने एअर इंडिया विकत घेतली आहे. ही बोली टाटा ग्रूप आणि स्पाईसजेटचे अजय सिंह यांनी लावली होती. एअर इंडियामधील शेअर विकण्याचा हा सरकारचा दुसरा प्रयत्न आहे. कारण, यापूर्वीही 2018 साली सरकारने कंपनीचे 76 टक्के शेअर विकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता.
1932 साली टाटांनी सुरू केली होती विमानसेवा
जे. आर. डी. टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअर सर्विसेज सुरु केली होती. त्यानंतर टाटा एअरलाइन्स झाली. 29 जुलै 1946 रोजी ती पब्लिक लिमिडेट कंपनी झाली. 1953 मध्ये सरकारने टाटा एअरलाइन्सला विकत घेतले आणि ती सरकारी कंपनी बनली. सरकारच्या कर्जामध्ये अडकलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी जानेवारी 2020 पासून गुंतवणूक प्रक्रिया सुरु झाली होती.
दरम्यान, देशात कोरोना महारोगराईची परिस्थिती निर्माण झाली. ही प्रक्रिया त्यामुळे 1 वर्षापर्यंत स्थगित झाली. यंदाच्या वर्षात एप्रिलमध्ये सरकारने इच्छुक कंपन्यांनी एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी आर्थिक बोली लावली. यासाठी 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख ठेवली गेली होती.
आर्थिक बोली लावण्यासाठी अंतिम तारखेत वाढ केली जाणार नाही, असे नुकतेच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत सरकारकडे काही कंपन्यांची आर्थिक बोली आली होती. सरकारने यापूर्वी 2018 मध्ये एअर इंडियाचा 76 टक्के भाग विक्री करण्याचा विचार केला होता. परंतु, तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सरकारने या वर्षात कंपनीचा 100 टक्के भाग विक्री करण्याची घोषणा केली.
या डिलमध्ये 1500 करोडचं मुंबईचं ऑफिसही
एअर इंडिया कंपनीचे मुंबईतील हेड ऑफिस आणि दिल्लीतील एअरलाईन्स हाऊसदेखील या डिलमध्ये सामील आहे. सध्यस्थितीत मुंबईतील एअर इंडियाचं ऑफिस सुमारे 1500 करोडपेक्षाही जास्त आहे. एअर इंडिया कंपनीचे देशामध्ये 4400 आणि विदेशात 1800 लँडिंग आणि पार्किंग स्लॉटला नियंत्रित करते.
पण, प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली ही कंपनी
ही कंपनी विकण्याचे प्रयत्न सरकारचे पहिल्यापासून सुरू होते. मात्र त्यांना यश मिळलं नाही. 2018 मध्ये 76 टक्के शेअर विकण्याचा निर्णय घेतला होता. पण, सरकारने त्यावेळी सरकारने मॅनेजमेंट कंट्रोल आपल्याकडे ठेवण्याची भूमिका घेतली होती. जेव्हा या भूमिकेमुळे ही कंपनी विकत घेण्यात कुणी रस दाखवला नाही तेव्हा सरकारने मॅनेजमेंट कंट्रोलसहीत कंपनी विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा डील झाली आहे. सध्या एअर इंडियावर 60 हजार 74 कोटी रुपयांचं कर्ज आहे. मात्र, खरेदी करणार्‍याला कंपनीला 23,286.5 कोटी द्यावे लागणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *