Sunday , September 20 2026
Breaking News

‘त्या’ दुर्देवी बालिकेचा अखेर मृत्यू

Spread the love

बेळगाव : दोन वर्षीय बालिकेचा ऊसाच्या शेतात जाळून खून केल्याचा गंभीर प्रकार अथणी तालुक्यात उघडकीस आला आहे.
त्या चिमुरड्या बालिकेला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचाराचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला असून खळबळ माजवणारी ही घटना आहे.
आज सकाळी अथणी जवळील एका शेतात त्या मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. रुग्णवाहिकेतून तो मृतदेह लागलीच बेळगावला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला.
मृत झाल्यावर हा मृतदेह सध्या जिल्हा शवागारात ठेवण्यात आला आहे.
अंधश्रद्धेतून ही घटना घडल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. बालिकेला अशा प्रकारे संपविण्यात आल्यामुळे चर्चा होत असून संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *