आरोग्यमंत्री के. सुधाकर
बेंगळुरू : कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की, कर्नाटक सरकार संभाव्य कोविड -19 च्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.
पत्रकारांशी बोलताना सुधाकर म्हणाले, सरकारी यंत्रणा परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. पण, कोविडचा प्रसार हाताळण्यासाठी आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज आहे. उपचार देणे हा एक भाग आहे पण लोकांचीही जबाबदारी आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
तिसरी लाट केव्हा येणार या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. लाट केंव्हाही आली तरी ती हाताळण्यासाठी आम्ही सज्ज आहे. मात्र नागरिकांनी सावधगिरीने आणि जबाबदारीने वागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सध्या मास्कचा वापर न करता नागरिक सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये हे बघायला मिळत आहे. लाट येऊ शकते यासाठी खबरदारी घेऊन नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास सरकारवरील ताण कमी करता येणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.