इम्फाळ : मुसळधार पावसामुळे मणिपूरमध्ये भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. यात घटनेत लष्कराचा एक कॅम्प मातीच्या ढिगार्याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मातीच्या ढिगार्याखाली अद्यापही अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आले असून, गंभीर जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहे. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तुपुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिरीबामला इम्फाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार करण्यात येत होता, ज्याच्या संरक्षणासाठी 107 टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अचानक भूस्खलन झाले. ज्यात अनेकजण मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
अमित शाहांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
दरम्यान, या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मणिपूरमधील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भूस्खलन घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta