ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. बोरिस जॉनसन हे पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले तर भारतीय वंशांचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात. सुनक हे भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत.
दरम्यान, बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू होता. अनेक नेते बोरिस यांच्यावर नाराज होते. यामुळे पक्षात बंडाचे वारे वाहत असल्याची बोरिस यांनाही कल्पना होती. मात्र अचानक अर्थमंत्री ऋषि सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी ५ जुलैला आपल्या पदाचा राजीनामा देत जॉन्सन यांना धक्का दिला. तर बोरिस जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या दोघांनी सांगितले होते. तसेच जाता जाता बोरिस त्यांच्या नेतृत्वावरच या दोघांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे बोरिस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यास भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात.
कडाऊनच्या दरम्यान आपल्या सरकारी निवासावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केलेली दारुची पार्टी त्यांना आता महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात असलेली जनतेची नाराजी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय की, असं सांगितलं जातंय की लवकरच जॉनसन यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. दुसरीकडे, ही बातमी मात्र भारतासाठी आनंददायी ठरु शकते. कारण जर बोरिस जॉनसन हे आपल्या पदावरुन पायउतार झाले तर भारतीय वंशांचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनू शकतात.
Belgaum Varta Belgaum Varta