जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निधन झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. भरसभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळीबार
जपानच्या नारा शहरात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. जपानच्या वृत्तसंस्था एनएचकेनुसार शिंजो आबे यांच्यावर भाषणादरम्यान गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. दुसर्या एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पश्चिम जपानमध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं भाषण सुरु होतं. यावेळी ते अचानक खाली कोसळले. त्यावेळी शिंजो आबे जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलं. तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta