Tuesday , March 3 2026
Breaking News

रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला : एनसीबी

Spread the love

 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करुन त्याला दिला. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली. ३५ आरोपींविरोधात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होते.
सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आपला भाऊ शौविक आणि अन्य आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी केला आणि सुशांतसिंह राजपूतला दिला होता. एनसीबीने दावा केला आहे की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सगळ्या आरोपींनी एकमेकांसोबत मार्च २०२० पासून डिसेंबर २०२० पर्यंत कारस्थान रचलं होतं, जेणेकरुन ते बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्सचं वाटप आणि खरेदी विक्री करू शकतील. आरोपींनी मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीला वित्तपुरवठा केला, तसंच गांचा, चरस, कोकेनसारख्या अमली पदार्थांचा वापरही केला. यासाठी सर्व आरोपींच्या विरोधात कलम २७ आणि २७ ए, २८ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
हे आरोप निश्चित करण्याआधी न्यायालय सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यासाठीच्या याचिकेवर विचार करेल. एनडीपीएस अंतर्गत प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी या प्रकरणातल्या सुनावणीसाठी २७ जुलै ही तारिख दिली आहे. आता पुढची सुनावणी १५ दिवसांनंतर होईल.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *