नवी दिल्ली : विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या आणि राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याची घोषणा शरद पवार यांनी केली.
विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यात शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते जयराम रमेश, डी. राजा, टी. आर. बालू, रामगोपाल यादव, सीताराम येच्युरी इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.