काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त पथकावर आज (दि. १७) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे एएसआय शहीद झाले. या हल्ल्यानंतर परिसरातील शोध मोहिम तीव्र करण्यात आली आहे.
पुलवामामधील सर्कुलर रस्त्यावरील बथुरा क्रासिंगजवळील तैनात असणार्या पोलीस व सीआरपीएफ पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार केला. त्यांना जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सीआरपीएफचे एएसआय गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात शोध मोहित तीव्र करण्यात आली आहे. पसिरात नाकाबंदी करण्यात आली असून, शोध मोहित तीव्र करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.