Sunday , December 22 2024
Breaking News

नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी

Spread the love

पाटणा : भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर जेडीयूने पुन्हा राजदशी संसार थाटलाय. आणि जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपला ‘दे धक्का’ घेतल्यानं तिथलं जेडीयू-भाजप सरकार काल कोसळलं. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ घेत महागठबंधन सरकारची सत्ता बिहारमध्ये आणली आहे. नितीश कुमार यांच्या भूमिकेनं बिहारमध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपनं जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमधली सत्ता मात्र गमवावी लागली आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यासोबतच आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणतंच चित्र स्पष्ट नाही. बिहारमधील महागठबंधनमध्ये जेडीयू, राजद, काँग्रेस, हम आणि वाम दल यांचा समावेश आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित

शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब राजभवनात उपस्थित होतं. त्यात राबडी देवी, तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या पत्नी राहेल यादव यांचा समावेश आहे. अन्य कोणत्याही पक्षाच्या किंवा राज्यातील बड्या नेत्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. तसेच, लालू प्रसाद यादव मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

About Belgaum Varta

Check Also

नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी

Spread the love  नवी दिल्ली : “देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *