Saturday , October 19 2024
Breaking News

रायगडमध्ये शस्त्रांनी भरलेली बोट आढळली; एके-47, स्फोटके जप्त

Spread the love

 

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पैकी एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत.
रायगडसह आसपासच्या परिसरात नाकाबंदी
सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी जिल्हाभर नाकाबंदी लागू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर येथे एक छोटी बोट सापडली आहे. त्यात 3 एके-47 व स्फोटके सापडले आहेत. याशिवाय श्रीवर्धनमधील भरडखोल येथेही एक बोट संशयास्पदरित्या आढळली आहे. या बोटीमध्ये लाइफ जॅकेट आणि काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. बोटीतील स्फोटके व बंदुकांमुळे महाराष्ट्रात घातपाताचा काही डाव होता का? ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने नाकाबंदी लागू केली. घटनास्थळी दहशतवादविरोधी पथकही दाखल झाले आहे.
पोलिसांची चिंता वाढली
दोन्ही बोटीजवळ कोणीही व्यक्ती सापडलेली नाही. रायगडसोबतच मुंबई व आसपासच्या परिसरात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, 13 वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तैयबाचे 10 पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गेच मुंबईत आले होते. ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्स स्फोटकेदेखील श्रीवर्धनच्या किनार्‍यावर उतरवण्यात आले होते. आतादेखील दोन बोटी संशयास्पदरित्या श्रीवर्धन किनार्‍यावरच आढळल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासनाची चिंता वाढली आहे. रायगडमध्ये सापडलेल्या बोटींबाबत पोलिस स्थानिकांची चौकशी करत आहेत. तसेच, पोलिसांनी दोन्ही बोटीदेखील जप्त केल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर; 20 नोव्हेंबरला मतदान, 23 तारखेला निकाल

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *