Wednesday , March 4 2026
Breaking News

लखनौमध्ये हॉटेलला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू

Spread the love

 

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी झाले आहेत. हजरतगंज येथील हॉटेल ‘लेवाना’मध्ये सकाळी आग लागली. आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने, खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला असल्याने अग्निशमन दलाच्या बचावकार्यात अडथळा येत होता. यामुळेच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचार्‍यांनी बचावकार्यासाठी खिडक्या फोडण्यास सुरुवात केली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी आहेत.
सकाळी 6 वाजता ही आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. धूर झाल्याने हॉटेलमधील अनेकांचा जीव गुदरमत होता. आतमध्ये अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्याचं मोठे आव्हान अग्निशन दलासमोर होते. सुटका करण्यात आलेल्या काहीजणांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *