Monday , December 8 2025
Breaking News

मोहालीमध्ये 60 विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल

Spread the love

 

मोहाली : पंजाबच्या मोहालीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थीनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या प्रकरणात आंघोळीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही तरुणींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण देत कोणत्याही तरुणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
60 विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल
मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. धक्कादायक म्हणजे याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीनं 60 विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शिमल्यात राहणार्‍या एका मित्राला पाठवले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोठा गोंधळ घातला. त्यानंतर व्हिडीओ बनवणार्‍या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आरोपी तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणावरून विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ घातला. यानंतर एमएमएस बनवणार्‍या तरुणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपी तरुणी अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवत होती आणि तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठवत होती. या तरुणाने हे व्हिडीओ इंटरनेटवर टाकले होते. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल झाले. जेव्हा तरुणींनी त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *