Sunday , December 22 2024
Breaking News

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दारुच्या नशेत असल्याने त्यांना विमानातून खाली उतरवले?

Spread the love

 

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आला. ‘द हिंदू’ने जर्मनी दौर्‍यावर असणार्‍या भगवंत मान यांची प्रकृती ठीक नसल्याने विमान प्रवास लांबला असल्याचं वृत्त दिलं आहे. मात्र सोशल मीडियावर भगवंत मान यांच्याबाबत इतर दावे होत असून आम आदमी पक्षानेही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
विरोधी पक्षांनी आम आदमी पक्षाला लक्ष्य केलं असून याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तब्येत ठीक नसल्याने भगवंत मान यांना परत येण्यास उशीर झाला असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. भगवंत मान यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र आम आदमी पक्षाने हा कट असल्याचा आरोप केला आहे.
अकाली दलाकडून टीका
दाव्यानुसार, भगवंत मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. जास्त नशेत असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याचे काही रिपोर्ट्स येत आहेत. त्यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनालाही ते गैरहजर राहिले. या घटनेने जगभरातील पंजाबींना लाज वाटत आहे, असं ट्विट अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी केलं आहे.

About Belgaum Varta

Check Also

नवीन संसद भवन ही केवळ इमारत नाही तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी

Spread the love  नवी दिल्ली : “देशाच्या विकासाच्या प्रवासात काही क्षण अमर होतात. 28 मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *