उत्तर प्रदेशमधील भदोही मध्ये नवरात्रीचा मंडप घालण्यात आला होता. याच मंडपात रविवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 64 जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आगीत होरपळून आतापर्यंत दोन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आगीत होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांवर वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भदोहीमध्ये दुर्गा पुजेदरम्यान मंडपाला आग लागली आहे. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. ज्यावेळी मंडपात आग लागली त्यावेळी मंडपात तब्बल 150 भाविक उपस्थित होते. आग इतकी भीषण होती की, त्यामध्ये जवळपास 64 भाविक होरपळे. तर आगीत होरपळल्यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. उपस्थितांपैकी 40 टक्क्यांहून अधिक भाविक आगीच्या भक्ष्यस्थानी आले आहेत. यामध्ये अनेकजण 30 ते 40 टक्के भाजले आहेत. तर काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta