Tuesday , March 3 2026
Breaking News

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचं संजय राऊतांविरोधात पत्र; लहान मुलांचा फोटो शेअर केल्याने कारवाई करण्याचे आदेश

Spread the love

 

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्याविरोधात चौकशी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्र पाठवलं आहे. संजय राऊत आणि राधव चढ्ढा यांनी राजकीय कारणासाठी ट्वीटरवर लहान मुलाचा फोटो वापरलाल्याने त्यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांनी कथितपणे फोटो शेअर करण्याचा उद्देश म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सुरू असलेल्या सीबीआयच्या तपासापासून लक्ष हटवणे हा होता, असे बाल हक्क आयोगाचे निरीक्षण आहे.

बाल हक्क संरक्षण आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आणि राघव चड्ढा यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सबद्दल तक्रारी आल्या आहेत. या दोघांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मनीष सिसोदिया शाळेत अल्पवयीन मुलांसोबत दिसत आहेत. या प्रकरणाचा तपास आणि आवश्यक कारवाईसाठी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले असून त्याची प्रत दिल्लीच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आली आहे. याशिवाय आयोगाने दिल्ली पोलिसांना बाल न्याय कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.

“मुलांच्या संमतीशिवाय फोटो शेअर करून आणि वापरून त्यांच्या वैयक्तिक अजेंड्याचा प्रचार करण्यासाठी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल” एफआयआर दाखल केला जाईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *