Monday , December 8 2025
Breaking News

धर्मपुरीत तीन हत्तीणींचा विजेचा धक्का लागून मृत्यू, मयत आई हत्तीणींकडे जाण्यासाठी पिल्लांची केविलवाणी धडपड

Spread the love

 

तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची माहिती धर्मपुरी वनविभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. एएनआयने ट्वीटकरून याची माहिती दिली आहे.

एएनआयने म्हटल्याप्रमाणे, धर्मपुरी जिल्ह्यातील मरंदहल्ली येथे तीन हत्ती विजेचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना या विजेचा धक्का लागला. विजेचा धक्का लागल्याने या हत्तींचा मृत्यू झाला. दरम्यान बेकायदेशीरपणे विद्युत कुंपण बसवल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली, अशी माहिती धर्मापुरीच्या वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली.

द हिंदूने दिलेल्या माहितीप्रमाणे, धर्मपुरीतील केंदनहळ्ळी येथील काली कवुंदर कोट्टई गावात सोमवारी रात्री १०.३० वाजता राखीव जंगलाजवळ ही घटना घडली. मयत तिन्ही हत्ती या मादी म्हणजेच हत्तीणी होत्या. त्या त्यांच्या ग्रुपमधील त्यांच्या पिल्लांसह जात होत्या. वनविभागाचे अधिकारी मरंदहल्लीतील या तीन प्रौढ हत्तीणी आणि दोन पिल्लांचा मागोवा घेत होते.

दरम्यान, हे हत्ती कोट्टई गावातील एका शेताजवळ पोहोचले. मात्र, प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतक-याने बेकायदेशीरपणे टाकलेल्या विजेच्या तारांचे कुंपण ओलांडताना या तीन्ही हत्तीणींना विजेचा धक्का लागला. आम्हाला त्या हत्तीणींचा वेदनादायक रडण्याचा आवाज ऐकू येईल तोपर्यंत त्या आमच्या नजरेआड झाल्या होत्या. मात्र तरीही शक्य तितक्या तातडीने आम्ही घटनास्थळापर्यंत पोहोचलो, अशी माहिती जिल्हा वनअधिकारी के. व्ही. ए. नायडू यांनी दिली.

नायडू म्हणाले, आम्ही जेव्हा पोहोचलो. तेव्हा आमच्या पथकाला दोन पिल्लूंसह तीन जमिनीवर पडलेल्या या हत्तीणी सापडल्या. आम्ही तातडीने वीज विभागाच्या कर्मचा-यांना वीजपुरवठा खंडीत करण्याचे सूचीत केले. त्यामुळे या गटातील दोन्ही लहान पिल्लू बचावले. हे दोन्ही पिल्लू सकाळपर्यंत त्यांच्या आईजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. मयत हत्तीणींचे वय 30 वर्ष होते.

नायडू म्हणाले शेतात, धातूच्या पट्ट्यांमधून दीड फूट उंच लाकडी काठीतून थेट वायरमधून हूक ड्रॉइंग पॉवरसह धातूच्या रॉडल्या चिकटेली होती. ईबी विभागाने शेतात नियमित गस्त राबवली असती तर हे टाळता आले असते. अशा प्रकारे थेट तारांमध्ये बेकायदेशीरपणे टॅपिंग सहसा रात्री 10 नंतर केली जाते आणि पहाटेच्या आधी ते बाहेर काढले जाते. मात्र, नियमित गस्त घालणे शेतात वीज खंडित करून शिक्षा करणे या उपायांमुळे ही घटना टाळता आली असती. मात्र, ईबी कडून अशा कोणत्याही मोहिमा न राबविल्याने शेतक-यांची हिंमत वाढली, असे नायडू यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी 67 वर्षीय शेतकरी मुरुगसेन याला अटक करण्यात आली आहे. काही आठवड्यांपूर्वी, कावेरी उत्तर वन्यजीव अभयारण्याचा सर्व भाग असलेल्या शेजारच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील डेंकनीकोट्टई येथे अशाच प्रकारे एका हत्तीला बेकायदेशीर कुंपणाने विजेचा धक्का बसला होता. वनविभागाला माहिती मिळेपर्यंत हत्तीचे शवही शेतकऱ्याने गुप्तपणे दफन केले होते.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *