Wednesday , March 4 2026
Breaking News

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अखेर आरोपपत्र दाखल

Spread the love

 

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अखेर आज (दि.१५ जून) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बृजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून आरोपत्र दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

कुस्तीपटूंनी दिलेल्या जबाबावरून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात दिल्ली पोलिसांनी 1 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम 354, 354D, 345A IPC अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच POCSO प्रकरणात कथित पीडिता आणि पीडितेच्या वडिलांच्या विधानाच्या आधारावर अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती देखील दिल्ली पोलिस जनसंपर्क अधिकारी सुमन नलवा यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *