Friday , November 22 2024
Breaking News

महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला!

Spread the love

 

पुण्यातील आयएसआयएसच्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आलं आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून एक चारचाकी वाहन आणि दोन अग्निशस्त्रे तसेच पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

रेकी करण्यासाठी वापरलेली वाहनं जप्त
अटक आरोपी आणि फरार साथीदार आरोपी यांनी पुणे आणि इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेले एक दुचाकी वाहनही महाराष्ट्र एटीएसने जप्त केलं आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान वय (23 वर्षे) आणि मोहम्मद यूनुस मोहम्मद याकूब साकी (वय 24 वर्षे), या दोन्ही आणि त्यांचा पळून गेलेला साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला होता. हे आरोपी मध्य प्रदेशातील रतलामचे रहिवासी आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास सुरु झाला.

दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
पोलीस कोठडीतील आरोपीकडे केलेल्या तपासात तसेच त्यांचकडील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये मिळून आलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे कनेक्शन तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपी खान आणि साकी या दोघांनी जंगल परिसराची रेकी केली. तसेच तेथे ते काही दिवस लपून होते. आपलं अस्तित्व लपवण्यासाठी त्यांनी जंगलात काही दिवस वास्तव्य केलं होतं. तेथून ड्रोनद्वारे रेकी केली होती. आरोपीनी जंगल परिसरात वास्तव्य करण्यासाठी टेन्ट वापरले होते. ते टेन्ट आणि इतर साहीत्यही एटीएसने जप्त केलं आहे.

साथीदारांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण
आरोपींनी त्यांच्या साथीदारांकरता बॉम्ब बनविण्याचं शिबीर आयोजित केलं होतं. आरोपीकडून बॉम्ब बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे, ज्यामध्ये केमिकल्स, केमिकल पावडर, लॅब इक्युपमेन्टस त्यामध्ये थर्मामिटर, पिपेट असे साहीत्य जप्त करण्यात आलं आहे. बॉम्ब तसेच प्रशिक्षण शिबीर आयोजित करून ज्या ठिकाणी बॉम्बचे साहित्य पुरुन ठेवलं होतं. त्या ठिकाणाहून केमिकल्स आणि केमिकल्स पावडरसह इतर साहित्या एटीएसने हस्तगत केलं आहे. महाराष्ट्र एटीएसने आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे.

कोंढव्यातील दहशतवादी मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात
एनआयए आणि एटीएस या दोन वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी उद्ध्वस्त केलेली पुण्याच्या कोंढवा भागातील दहशतवाद्यांची मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती आणि एकमेकांना मदतही करत होती, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण एनआयएने अटक केलेला झुल्फीकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसै पुरवत असल्याच स्पष्ट झालं आहे. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने बरोडावालाचा एनआयएच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या बरोडावालाचा ताबा घेऊन त्याची चौकशी सुरु केली.

About Belgaum Varta

Check Also

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love  जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *