यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा फेटाळला आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी मला मोदी किंवा भाजप सरकारमुळे काहीच मिळालं नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, अशी माहिती दिली आहे.
काल संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. कलावती यांच्या गरिबीची कहाणी अमित शाह यांनी सांगितली. नंतर त्यांना कुठलीही मदत केली नाही, असा आरोप केला होता. पण, राहुल गांधी कोणत्याही कलावतींना भेटले नाही, असंही शाह यांनी म्हटलं होतं. तर यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदुरकर यांची भेट घेऊन राहुल गांधी यांनी कलावतींच्या समस्या सोडविल्या असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे
Belgaum Varta Belgaum Varta