Wednesday , March 4 2026
Breaking News

वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मारहाण, शिक्षकाला अटक

Spread the love

 

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील विद्यार्थ्यांना एका मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करायला लावली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजं असताना आता जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थ्याने वर्गातील फलकावर ‘जय श्री राम’ लिहिल्याने ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे.

याप्रकरणी आरोपी शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. तर मुख्याध्यापक फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *