Tuesday , March 3 2026
Breaking News

खूशखबर! सोने-चांदी झालं स्वस्त, दिवाळीत सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा

Spread the love

 

नवी दिल्ली : दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदी करणाऱ्यासाठी खूशखबर आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी, बुधवारी सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, बाजारात ग्राहकांची लगबग पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीच्या आधीच सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर घटताना दिसत आहेत.

सणासुदीच्या तोंडावर सोनं स्वस्त
आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं 160 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गुडरिटर्न्स वेबसाईट नुसार, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 61,200 रुपये आहे. मंगळवारी हा दर 61,360 रुपये होता. त्यासोबतच 22 कॅरेट सोनं 150 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 56,250 वरून 56,100 रुपयांवर पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही घसरण
सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज चांदीचा दर 1000 रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर 74,500 रुपयांवरून 73,500 रुपयांवर पोहोचला आहे.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर

मुंबई – मुंबईत सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
दिल्ली – 160 रुपयांनी स्वस्त होऊन सोने 61350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आले आहे.
कोलकाता – सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 61200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चेन्नई – सोने 100 रुपयांनी स्वस्त होऊन 61750 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *