Monday , December 23 2024
Breaking News

डीएमडीकेचे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन

Spread the love

 

चेन्नई : लोकप्रिय तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत यांचे कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एमआयओटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विजयकांत यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

कॅप्टन विजयकांत यांनी 2005 मध्ये देसिया द्रविड कडगम (डीएमडीके) या पक्षाची स्थापना केली होती. 2006 मध्ये त्यांनी तामिळनाडू निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयकांत यांचा विजय झाला होता. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत डीएमडीकेला यश आलं. 41 जागांपैकी 29 जागा पार्टीला मिळाल्या होत्या.

कोण आहेत विजयकांत?
तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा म्हणजे विजयकांत. ते डीएमडीके पक्षाचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष होते. 2011 ते 2016 दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी काम केलं आहे. तसेच टॉलिवूडमधील ते एक लोकप्रिय अभिनेते आहेत. 154 सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.
विजयकांत यांनी 154 सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. चेन्नईत विजयकांत यांचं एक इंजीनियरिंग कॉलेज आणि कोयम्बेडु नावाचा लग्नाचा हॉल आहे. अभिनेते असण्यासोबत ते निर्माता आणि दिग्दर्शकही होते. विरुधाचलम आणि ऋषिवंदियम या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे.

विजयकांत यांचा सिनेप्रवास

विजयकांत यांनी ‘इनिक्कुल इलामाई’ या सिनेमाच्या माध्यमातून 1979 रोजी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्यांनी विरोधी भूमिका साकारली होती. एमए काजा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. विजयकांत यांचे आगल विलक्कू, नीरोत्तम आणि सामंथिप्पू हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. तर नूरवथु नाल, वैदेगी काथिरुंथाल, कूलिएकरन, वीरन, वेलुथांबी, उझवान मगन हे सिनेमे त्याचे सुपरहिट ठरले आहेत.
विजयकांतने विविध सिनेमांत अष्टपैलू भूमिका साकारल्या आहेत. पण ऍक्शन हिरो म्हणूनही ते लोकप्रिय होते. विजयकांत यांचे अनेक सिनेमे ब्लॉकबस्टर झाले आहेत. फिल्मफेअर पुरस्कासह अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड

Spread the love  नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *