
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातील चार्जशीटमध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, त्यांना या प्रकरणी आरोपी करण्यात आलेले नाही.
रॉबर्ट वड्रा यांच्या निकटवर्तीयांकडून आर्थिक गैरव्यवहार
चार्जशीटमध्ये प्रियांका गांधींचे नाव जोडल्यानंतर काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. रॉबर्ट वड्रा आणि थंपी यांच्याबरोबरच प्रियंका गांधींनीही फरिदाबादमध्ये जमीन खरेदी केली होती. रॉबर्ट वड्रा यांचे निकटवर्तीय संजय भंडारी यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सध्या ईडी करत आहे. या तपासातूनच ही माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणी प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा अजून तरी आरोपी नाहीत, असे ईडीने स्पष्ट केले आहे.
रॉबर्ट वड्रा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप
सक्तवसुली संचनालयाने (ईडी) रॉबर्ट वड्रा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लंडन येथे रॉबर्ट वड्रा यांच्या घर होते. एलर्टन हाउस, ब्रायनस्टन स्क्वायर असे रॉबर्ट वड्रा यांच्या घराचे नाव आहे. वड्रा यांचे हे घर प्रॉपर्टी डिलर संजय भंडारी यांनी 2009 मध्ये खरेदी केले होते. त्यानंतर सीसी थंपी यांनी 2010 मध्ये या स्थावर मालमत्तेचा व्यवहार केला होता.
Belgaum Varta Belgaum Varta