Monday , December 8 2025
Breaking News

शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली, दोन शिक्षकांसह १२ मुलांचा मृत्यू

Spread the love

 

वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील हर्णी तलाव विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली. या हृदयद्रावक घटनेत दोन शिक्षकांसह 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 15 जणांची कॅपेसिटी असलेल्या बोटीवर न्यू सनराइज स्कूलचे 25-27 विद्यार्थी बसवले होते. यावेळी त्यांना लाईफ जॅकेदेखील घातले नव्हते.

या घनटेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि इतर विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले आहे. या घटनेतील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोटीत जास्त विद्यार्थ्यी बसल्यामुळे ही घटना घडली. तसेच, विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेटदेखील घातले नव्हते, ज्यामुळे 2 शिक्षक आणि 12 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे वडोदराचे जिल्हाधिकारी एबी गोरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, दोषींवर कारवाई केली जाईल, असे वडोदरा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ.शिलत मिस्त्री यांनी सांगितले. या घटनेवर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्राण गमावलेल्या निष्पाप मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *