Monday , December 8 2025
Breaking News

लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर! महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश

Spread the love

 

नवी दिल्ली : भाजपने बुधवारी (दि.13) लोकसभा निवडणुकीसाठी 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी भाजपने गेल्या आठवड्यात 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. पण दुस-या यादीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे.

दुसरी यादी प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रासह 10 राज्यांवर केंद्रित आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि एमएल खट्टर यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून तर गृहमंत्री अमित शहा गुजरातच्या गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा अधिसूचित करण्यापूर्वीच सत्ताधारी पक्षाची यादी येत आहे.

बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीतील महाराष्ट्रातील नावे
नितीन गडकरी (नागपूर), रक्षा खडसे (रावेर), मुरलीधर मोहोळ (पुणे), पंकजा मुंडे (बीड), सुजय विखे-पाटील (अहमदनगर), सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), भारती पवार (दिंडोरी), अनुप धोत्रे (अकोला), रावसाहेब दानवे (जालना), सुभाष भामरे (धुळे), प्रताप पाटील-चिखलीकर (नांदेड), संजयकाका पाटील (सांगली), रणजीत निंबाळकर (माढा), पियुष गोयल (उत्तर मुंबई), मिहीर कोटेचा (उत्तर पूर्व), सुधाकर श्रृंगारे (लातूर), स्मिता वाघ (जळगाव), कपिल पाटील (भिवंडी), रामदास तडस (वर्धा), डॉ. हिना गावित (नंदुरबार).

कर्नाटकातील आठ विद्यमान खासदारांनी गमविली उमेदवारी

दरम्यान, यावेळी भाजपने एकूण ८ विद्यमान खासदारांना तिकीट नाकारले आहे. म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह, बंगळुर उत्तरचे खासदार डी. व्ही. सदानंद गौडा, कोप्पळचे खासदार करडी संगण्णा, हावेरीचे खासदार शिवकुमार उदासी, तुमकूरचे खासदार जी. एस. बसवराजू, दक्षिण कन्नडचे खासदार नळीनकुमार कटील, चामराजनगरचे खासदार श्रीनिवास प्रसाद, बेळ्ळारीचे खासदार देवेंद्रप्पा यांनी उमेदवारी गमविली आहे.

भाजपचे जाहीर उमेदवार असे
चिक्कोडी – अण्णासाहेब जोल्ले
बागलकोट – पीसी गद्दीगौडर
उडुपी-चिक्कमगळूर – कोटा श्रीनिवास पुजारी
हावेरी – बसवराज बोम्मई
विजापूर – रमेश जिगजीनगी
शिमोगा – बी. वाय. राघवेंद्र
म्हैसूर – यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयार
बंगळूर ग्रामीण – डॉ. सी. एन. मंजुनाथ
बंगळूर उत्तर – शोभा करंदलाजे
बंगळूर दक्षिण – तेजस्वी सूर्या
बंगळूर मध्य – पीसी मोहन
तुमकूर – व्ही. सोमण्णा
दक्षिण कन्नड – कॅप्टन ब्रिजेश चौटा
चामराजनगर – एस. बलराजू
धारवाड – प्रल्हाद जोशी
कोप्पळ – डॉ. बसवराज त्यवतूर
दावणगेरे – गायत्री सिद्धेश्वर
बेळ्ळारी – बी. श्रीरामुलू
गुलबर्गा – डॉ. उमेश जाधव
बिदर*भगवंत खूबा
…………………………

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *