Sunday , July 13 2025
Breaking News

पाकिस्तानी न्यायालायाने दहशतवादी हाफिस सईदला ठोठावली 31 वर्षांची शिक्षा

Spread the love


लाहोर : पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला एका प्रकरणात 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हाफिज सईद हा बंदी घातलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा प्रमुखही आहे आणि तो मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे.
यावेळी पाकिस्तानच्या न्यायालयाने हाफिज सईदला 3.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यासोबतच त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. हाफिज सईदविरोधातील न्यायालयाचा हा आदेश अशा वेळी आला आहे जेव्हा पाकिस्तानमध्ये राजकीय संकट गडद होत चालले आहे. इम्रान खान यांची खुर्ची गेली, पण पुढे सार्वत्रिक निवडणुका होतील की विरोधी पक्षांच्या महाआघाडीतून शाहबाज शरीफ पंतप्रधान होतील, यावर अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हाफिज सईदने बांधलेले मदरसे आणि मशिदीही सरकारी नियंत्रणात ठेवण्यात येणार आहेत. दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज लोणी यांनी सांगितले की, सुनावणी पूर्ण होताच कठोर शिक्षेची घोषणा केली. पाकिस्तानच्या सीआयडीने हाफिज सईद आणि इतरांवर दहशतवाद आणि निधी पुरवल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले होते. याआधीही विशेष दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला अनेक प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली आहे, मात्र तो बहुतांशी वेळा उच्च न्यायालयांतून त्याची सुटका झाली होती.

About Belgaum Varta

Check Also

उत्तर प्रदेशमध्ये ट्रकने दुचाकीला उडवले; ५ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  मेरठ : उत्तर प्रदेशच्या हापुडमधील मेरठ-बुलंदशहर महामार्गावर हा अपघात झाला. एकाच दुचाकीवरून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *