संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शासकीय रुग्णालयाला जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे. या मार्गावरुन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. रुग्णवाहिकेला शासकीय रुग्णालयाला जाण्यासाठी संकेश्वर बसस्टॅंड, निडसोसी कमान, निडसोसी रस्ता, अंकले रस्ता ते शासकीय रुग्णालय असा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. रुग्णाची परिस्थिती नाजूक असेल तर “नो इर्मजन्सी” असेच सांगणे भाग पडत आहे.
शासकीय रुग्णालयाचा मार्ग कधी करणार? संकेश्वर जुना पी. बी. रोड चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. आता संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल जवळच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर रस्ता थोडा उंचवट्यावर झाल्यामुळे संकेश्वर शासकीय रुग्णालयाला जाण्यासाठी दुचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ॲटोरिक्षा, चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग बंद झाला आहे. संकेश्वर जुना पी. बी. रोड चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी संकेश्वर शासकीय रुग्णालयाला जाणारा मार्ग प्राधान्य क्रम देवून तातडीने करावा. यासाठी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव यांनी शासकीय रुग्णालयाला जाणार मार्ग प्रथम पूर्ण करण्यास ठेकेदाराला भाग पाडावे, अशी मागणी लोकांतून केली जात आहे.
Check Also
संकेश्वर : पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. गंगाराम भूसगोळ विजयी
Spread the love संकेश्वर : संकेश्वर येथील प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार श्री. …