Wednesday , July 15 2026
Breaking News

कर्नाटकात कृषी कायदे मागे घ्यावेत : कोडीहळ्ळी

Spread the love


बेळगाव : कर्नाटकात कृषी कायद्यात पायाभूत स्तरावर सुधारणा करणे, भूसुधारणा कायदा, कृषी कायदा, जनावरांची हत्या, भूस्वाधीन कायदा हे कायदे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी केली.
बेळगाव साहित्य भवन येथे पत्रकारांशी ते बोलत होते. बसवनगुडी नॅशनल कॉलेज मैदानात शेतकरी मेळावा होत आहे. या मेळाव्याचा मुख्य उद्देश भारत सरकारने जारी केलेले कृषी कायदे मागे घेण्याचा आहे. जमीन सुधारणा कायदा, कृषी बाजार, गोहत्या कायदा आणि भूसंपादन कायदा कर्नाटकात मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून हे कायदे तातडीने मागे घेण्यात यावेत, अन्यथा मोठ्या प्रमाणात पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. कृषी बाजार कायद्यातील दुरुस्ती कशी धोक्याची ठरते हे सर्वश्रुत होते. या कायद्यांमुळे कृषी बाजारपेठेला ९० टक्के फटका बसला आहे. तरीही सरकारने विरुद्ध दिशेने कामकाज सुरु ठेवले आहे. मात्र नागरिक म्हणून आपण कसे गप्प राहावे, असा सवाल कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी उपस्थित केला. कृषी कायद्यांसंदर्भात कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या पाठीशी एकही राजकीय संघटना उभी नाही. शेतकऱ्यांचे हीत जपण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसून शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या मागण्यांचा विचार आता कोण करणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

About Belgaum Varta

Check Also

ऊसाच्या शेतात वीजतारेचा स्पर्श होऊन दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुधोळगी (मुडलगी) तालुक्यातील नागनूर गावाच्या हद्दीत ऊसाच्या शेतात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *