Thursday , September 19 2024
Breaking News

नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ; निमंत्रण पत्रिका आली समोर

Spread the love

 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील समोर आली आहे. मोदींच्या शपथविधी समारंभासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या ५ तुकड्या तसेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो आणि ड्रोन तसेच ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आले आहेत. शपथविधी समारंभाला येणाऱ्या परदेशी पाहुण्यासाठी दिल्लीतील अलिशान हॉटेल्समध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज, ओबेरॉय, क्लेरिजेस, लीला, आयटीसी मौर्य, हॉटेल्समध्ये परदेशी पाहुणे थांबणार आहेत.यामुळे हे हॉटेल्स देखील सुरक्षेच्या कक्षेत घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर शपथविधी सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रपती भवन आणि विविध महत्त्वाच्या ठिकाणी एनएसजी कमांडो तैनात असणार आहे. बाहेरील घेऱ्यातही दिल्ली पोलिसांतील जवान चोख बंदोबस्त ठेवणार आहे

मोदींच्या शपथविधीसाठी कोणकोणत्या नेत्यांची उपस्थिती?
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीक, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनुथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन लॉरी- बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love  चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *