Tuesday , March 3 2026
Breaking News

एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं सूचक विधान

Spread the love

 

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते, असे विधानही त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४० जागांवर विजय मिळविला. बहुमताचा २७२ हा आकडा त्यांना गाठता आला नाही. यासाठी त्यांना एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “एनडीए सरकार चुकून स्थापन झाले आहे. मोदींकडे बहुमत नाही. त्यांचे सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते. आम्हाला तर वाटते सरकार पाच वर्ष चालावे, देश चांगल्या पद्धतीने चालला पाहीजे. देश बळकट करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन काम करू. पण आमच्या पंतप्रधानांची सवय आहे की, जी गोष्ट व्यवस्थित सुरू आहे, ती त्यांच्या पचनी पडत नाही. आमच्या बाजूने आम्ही देशासाठी काम करत राहू.”

काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आघाडीच्या सरकारवर टीका करताच बिहारमधील जेडीयू पक्षाने याला उत्तर दिले आहे. जेडीयूने काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील पंतप्रधानांच्या कामगिरीकडे लक्ष वळविले. तसेच खरगे जो आरोप करत आहेत, त्यावर त्यांनी आधी स्वतःकडे बघावे, असेही सूचित केले.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *