Tuesday , March 3 2026
Breaking News

बिहारमध्ये सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

Spread the love

 

पाटणा : बिहारच्या जहानाबाद येथील बाबा सिद्धनाथ मंदिरात रविवारी चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. सात मृतदेह जहानाबादच्या शासकीय रुग्णायात नेण्यात आले आहेत. तसेच जखमींना देखील याच रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

जहानाबादच्या पोलीस निरीक्षकांनी या चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्य झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ३५ भाविक जखमी झाले असून त्यापैकी काहींना शासकीय रुग्णालयात नेले आहे. तर काहींना मखदुमपूर रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मंदिराच्या बाहेर फुले विकणाऱ्या फेरीवाल्याचे भांडण चालू होते. त्यावेळी लाठीहल्ला केला गेला. त्यातून लोक सैरावैरा धावू लागले आणि ही चेंगराचेंगरीची घटना घडली. ५० ते ६० जण जखमी झाले असावेत. ६ ते ७ जणांचे मृतदेह रुग्णावाहिकांमधून नेण्यात आल्याचे आम्ही पाहिले. ही धावपळ व चेंगराचेंगरीची घटना घडत असताना इथे पोलीस प्रशासन उपस्थित नव्हते. पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळेच ही घटना घडली आहे.

श्रावण महिन्यात भाविक या मंदिरात दर्शनासाठी जातात. प्रामुख्याने रविवारी रात्रीपासून मंदिरात लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. आसपासच्या गावांमधून, तालुक्यांमधून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. आज (१२ ऑगस्ट) श्रावणी सोमवार असल्यामुळे काल रात्रीपासूनच भाविकांनी या मंदिरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. अशातच ही दुर्घटना घडली.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *