मंदिर परिसर उजळला दिव्यांनी : भाविकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : ममदापूर (के.एल.) येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या तुळजा भवानी मंदिरात पुजारी ग्रामस्थ व निपाणकर घराण्याचे वंशजांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक दीपोउत्सव साजरा झाला.
प्रारंभी निपाणकर घराण्याची वंशज श्रीमंत दादाराजे निपाणकर व इतर घराण्यातील मान्यवरांचे ओंकार पुजारी यांनी स्वागत केले. यानंतर श्रीमंत दादाराजे निपाणकर व श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते दीपमाळेचे विधीपूर्वक पूजन करून दीपमाळ लावण्यात आली. ग्रामस्थ व भाविकांनी लावलेल्या दिल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला.
मान्यवरांच्या उपस्थितीत तुळजाभवानीची आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांना प्रसाद व दूध देऊन देण्यात आले. मंदिर परिसरात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. भाविकांनी फटाक्याची आतिषबाजी केली.
कार्यक्रमास निपाणकर घराण्याचे युवराज श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर, श्रीमंत राजेश्वरीराजे निपाणकर, श्रीमंत ऋतंबराराजे निपाणकर, श्रीमंत दिव्यलक्ष्मीराजे निपाणकर, सुजितसिंह गायकवाड, समर कांबळे, निकिता बाबर, अपासाहेंब पुजारी, अन्नासहेब पुजारी, विश्वास पुजारी, शरद पुजारी, सुरेश पुजारी, श्रीकांत पुजारी, भरत पुजारी, प्रमोद पुजारी, ओमकार पुजारी, प्रसाद पुजारी, चंद्रकांत पुजारी, राजू पुजारी, कल्पना पुजारी, अरुणा पुजारी, रंजना पुजारी, विमल पुजारी, अंजना पुजारी, गौरी पुजारी, शकुंतला पुजारी, पूजा पुजारी, रूपाली पुजारी, वर्षा पुजारी, दीपाली पुजारी, अमृता पुजारी, जयश्री पुजारी, अप्पासाहेब दिनकर पाटील, अनिल पाटील, लक्ष्मण नेजे, सागर खोत, रवि कदम, प्रसाद सदावर्ते, अनिल गोरवडे, सत्यशिल पाटील, संदीप हारेल, शुभम पाटील, पांडुरंग जरग, सतिश बामने, अभिजीत पाटील, श्रीनाथ पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब पुजारी, श्रीकांत पुजारी, शरद पुजारी, भरत पुजारी, प्रमोद पुजारी, सुरेश पुजारी, ओमकार पुजारी, प्रसाद पुजारी, राजू पुजारी, श्रीनिवास पुजार, नानासाहेब पुजारी यांनी परिश्रम घेतले. सुरेश पुजारी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta