निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी महापूरसह विविध कारणामुळे दरवर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांना शासनातर्फे तुटपुंजी भरपाई दिली जात आहे. याशिवाय साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा साखर मंत्री व साखर आयुक्तांनी दिला आहे. तरीही त्याला केराची टोपली दाखवत अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी आंदोलन सोमवारी (ता. ७) आम आदमी पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती येथील आम आदमी पक्षाचे प्रमुख डॉ. राजेश बनवन्ना यांनी दिली.
सोमवारी येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला ऊसाला किमान ३५०० रुपये प्रति टन दर मिळावा या मागणीसाठी निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी निपाणी भागातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी हजर राहण्याचे आवाहनही डॉ. राजेश बनवन्ना यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta